महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 4014 नवे रुग्ण, 59 रुग्णांचा मृत्यू - mumbai increase corona cases

मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

मुंबई कोरोना
मुंबई कोरोना

By

Published : Apr 27, 2021, 9:26 PM IST

मुंबई- शहरात गेले काही दिवस कोरोना विषाणूचे 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. गेले दोन दिवस 5 हजाराच्या घरात रुग्ण आढळून आले. काल त्यात आणखी घट होऊन 3876 नवे रुग्ण आढळून आले होते. आज 4014 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 8 हजार 240 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.

8 हजार 240 रुग्णांना डिस्चार्ज
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली. मुंबईत गेल्या काही दिवस 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. सलग पाच दिवस रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात आढळून आली आहे. मुंबईत आज 4 हजार 014 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 35 हजार 541 वर पोहचला आहे. आज 59 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 912 वर पोहचला आहे. 8 हजार 240 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 55 हजार 101 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 66 हजार 045 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 68 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 111 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 131 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 30 हजार 428 तर आतापर्यंत एकूण 53 लाख 02 हजार 490 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या -
गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938, 9 एप्रिलला 9200, 10 एप्रिलला 9327, 11 एप्रिलला 9989, 12 एप्रिलला 6905, 13 एप्रिलला 7898, 14 एप्रिलला 9925, 15 एप्रिलला 8217, 16 एप्रिलला 8839, 17 एप्रिलला 8834, 18 एप्रिलला 8479, 19 एप्रिलला 7381, 20 एप्रिलला 7214, 21 एप्रिलला 7684, 22 एप्रिलला 7410, 23 एप्रिलला 7221, 24 एप्रिलला 5888, 25 एप्रिलला 5542, 26 एप्रिलला 3876, 27 एप्रिलला 4014 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details