महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू कराव्यात; आयआयटी मुंबईसह देशातील ४० संशोधकांचे पत्र

लोकल सेवा सुरू करावी ही मागणी आयआयटी मुंबई, इंस्टिट्यूट ऑफ सायन्सेस बंगळुरू, आयआयटी दिल्ली, आयआयटी कानपूर आदी नामांकित संस्थांतील ४० संशोधकांनी एकत्र येऊन केली असून यावर विचार व्हावा असे मतही व्यक्त केली आहे. मुंबईत लोकल सुरू करण्यासाठी संशोधकांनी काही पर्याय दिले आहेत. तर दुसरीकडे खासगी किंवा विमान वाहतूक सुरू करून काही साध्य होणार नसल्याची टीका या संशोधकांनी केली आहे. लोकल सेवा सुरुवातील ५० टक्के क्षमतेने वापरात आणावी, हळूहळू त्यात बदल करून या क्षमतेत वाढ करावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत.

IIT bombay written a letter regarding local and long route trains
लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू कराव्यात; आयआयटी मुंबईसह देशातील ४० संशोधकांचे पत्र

By

Published : Sep 4, 2020, 12:55 AM IST

मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता अनलॉकडाउन-४च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. परंतू मागील काही महिन्यात निर्माण झालेल्या समस्या अजूनही कायम आहेत. त्यामुळे लोकांच्या गरजा लक्षात घेऊन मुंबईतील लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू केल्या पाहिजेत, अशी मागणी देशभरातील आयआयटी मुंबईसह विविध संस्थातील ४० संशोधकांनी केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या सह्यांचे एक पत्र सरकारला पाठवले आहे.

लोकल सेवा सुरू करावी ही मागणी आयआयटी मुंबई, इंस्टिट्यूट ऑफ सायन्सेस बंगळुरू, आयआयटी दिल्ली, आयआयटी कानपूर आदी नामांकित संस्थांतील ४० संशोधकांनी एकत्र येऊन केली असून यावर विचार व्हावा असे मतही व्यक्त केली आहे. मुंबईत लोकल सुरू करण्यासाठी संशोधकांनी काही पर्याय दिले आहेत. तर दुसरीकडे खासगी किंवा विमान वाहतूक सुरू करून काही साध्य होणार नसल्याची टीका या संशोधकांनी केली आहे. लोकल सेवा सुरुवातीला ५० टक्के क्षमतेने वापरात आणावी, हळूहळू त्यात बदल करून या क्षमतेत वाढ करावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत.

कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक बंद आहे. यामुळे व्यवहार थांबले असल्याने असंख्य नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. रोजगार आणि इतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार असल्याचे संशोधकांच्या पत्रात नमूद केले आहे.

मागील काही महिन्यात लांबलेल्या लॉकडाउनच्या काळात देशभरात लहान मुलांच्या कुपोषणाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. देशात कोरोना आणि त्यानंतरच्या एकूण परिस्थितीमुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेपेक्षा सार्वजनिक आरोग्यावर विशेष भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कालावधीत अनेक नवीन आजारांना आमंत्रण देण्यात आले आहे. याचबरोबर लहान मुलांचे लसीकरण, महिलांचे आरोग्य, हृदय रोग, कर्करोग, मधुमेह, टीबीसारख्या आजारांमध्येही वाढ झाली असल्याने त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे.

सर्व राज्यांनी ई-पास प्रणालीही रद्द करावी सोबत राज्यात आंतरजिल्हा जाण्यास नागरिकांना, तसेच व्यवहारासाठी सेवेला मुभा द्यावी अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details