मुंबई : ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ( negligence of the contractor ) एका ४ वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा ( 4 year old girl died ) लागला आहे. नवीन पनवेल मधील पंचशील नगर येथे रेल्वेच्या नवीन रुळांचे काम चालू आहे आणि या कामासाठी एक मोठा खड्डा कित्येक महिने ठेकेदाराच्या माध्यमातून खणून ठेवला आहे. मात्र त्याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने आज ४ वर्षाच्या चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागले ( 4 year old girl died In Panvel ). ही घटना 21 डिसेंबर 2022 रोजी घडली असून माही सिद्धेश वाघमारे असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
Girl Died : ठेकेदाराच्या हलगर्जीपणा; रेल्वेच्या खड्ड्यात पडून ४ वर्षाच्या चिमुकलीने गमावला जीव - railway ditch
नवीन पनवेल मधील पंचशील नगर येथे रेल्वेच्या नवीन रुळांचे काम सुरू आहे. पनवेल रेल्वे स्थानक परिसरात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ( negligence of the contractor ) एका चिमुकलीचा खड्ड्यात पडून मृत्यू ( 4 year old girl died In Panvel ) झाला आहे. माही सिद्धेश वाघमारे असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

याआधी तीन मुलींचा याच खड्ड्यात मृत्यू : मृत महिच्या घराजवळच रेल्वे चे काम चालू असल्याने ती खेळता खेळता तिथे गेली, असताना या खड्ड्यात पडली दुर्दैवाने तिचा यात मृत्यू झाला. पण हा खड्डा गेली कित्येक महिने तसाच खणून ठेवला आहे, विशेषतः शेजारी लोक वस्ती असताना सुरक्षा रक्षक या ठिकाणी नव्हता. या आधी देखील २०१९ मध्ये तीन मुलींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या चिमुकल्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांवर पोलीस कारवाई करावी, या घटनेसाठी ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे