महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded Amritsar special Train : ख्रिसमस निमित्त पंजाबला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाडीच्या 4 फेऱ्या सुरू - Nanded Amritsar special Train

( Nanded Amritsar special Train ) ख्रिसमसच्या सुट्ट्यामुळे नांदेड वरुन अमृतसरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाडीच्या 4 फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दिनांक 23 आणि 24 डिसेंबर 2022 पासून या गाड्या धावणार आहेत.( Amritsar Nanded Amritsar special Train )

4 Rounds Of  Amritsar Nanded Amritsar special Train
अमृतसर-नांदेड-अमृतसर विशेष रेल्वच्या गाडीच्या 4 फेऱ्या

By

Published : Dec 21, 2022, 2:23 PM IST

मुंबई : (Nanded Amritsar special Train ) ख्रिसमसच्या सुट्ट्या तसेच इतर सणामुळे महाराष्ट्रातून पंजाब मधील अमृतसरला जाण्यासाठी विशेष ट्रेन सुरू करण्यात आली आहे. यामुळे नांदेड ते अमृतसर जाणाऱ्या प्रवाशांची खास सोय होणार आहे. उद्या पासून या ट्रेन धावणार आहेत. नांदेड हे शहर शीख समुदायांसाठी विशेष आदराचे आणि प्रेरणास्थान म्हणून पाहिले जाते. त्यामुळे नांदेड ते अमृतसर पंजाब या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सोय केली आहे.( Amritsar Nanded Amritsar special Train )



ट्रेन याप्रमाणे धावणार : गाडी क्रमांक 04640 अमृतसर-हजुर साहिब नांदेड विशेष गाडी अमृतसर येथून दिनांक 22 आणि 23 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 04.25 वाजता सुटेल आणि जालंधर, राजपुरा, पानिपत, न्यू दिल्ली आया, ग्वालीजर, इटारसी, खांडवा, अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा मार्गे हजुर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 15.20 वाजता पोहोचेल.

अमृतसर विशेष गाडी : गाडी क्रमांक 04639 हजुर साहिब नांदेह अमृतसर विशेष गाडी हजुर साहिब नांदेड येथून दिनांक 23 आणि 24 डिसेंबर 2022 रोजी रात्री 23.10 वाजता सुटेल आणि पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, ग्वालीअर, आग्रा, न्यू दिल्ली, पानिपत, राजपुरा, जालंधर मार्गे अमृतसर येथे तिसन्या दिवशी सकाळी 09.30 वाजता पोहोचेल.या गाडीत द्वितीय श्रेणी शय्या तृतीय श्रेणी वातानुकुलीत जनरल असे 20 डब्बे असतील. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details