महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भानुशाली इमारत दुर्घटना : 'मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत, तर जखमींना ५० हजार' - भानुशाली इमारत दुर्घटना अपडेट

गुरुवारी फोर्ट भागातील सहा मजली भानुशाली इमारतीचा उत्तरेकडील भाग कोसळून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशामक दल व महानगरपालिकेच्या वतीने अद्याप शोध मोहिम सुरू आहे. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या.

bhanushali building collapsed update  bhanushali building collapsed news  guardian minster on bhanushali building collapsed  guardian minster aslam sheikh  भानुशाली इमारत दुर्घटना  भानुशाली इमारत दुर्घटना अपडेट  भानुशाली इमारत दुर्घटनेवर अस्लम शेख
पालकमंत्री अस्लम शेख

By

Published : Jul 17, 2020, 6:56 PM IST

मुंबई -मुंबईतील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख व जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी केली. तसेच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करून इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतीने करण्यात येईल, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.

भानुशाली इमारत दुर्घटना : 'मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत, तर जखमींना ५० हजार'
गुरुवारी फोर्ट भागातील सहा मजली भानुशाली इमारतीचा उत्तरेकडील भाग कोसळून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशामक दल व महानगरपालिकेच्या वतीने अद्याप शोध मोहिम सुरू आहे. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या. दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना शेख यांनी प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.

काय आहे नेमकी घटना -

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील जीपीओसमोरील भानुशाली इमारत गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कोसळली. मुंबईतील अतिधोकादायक इमारतीच्या यादीमधील ही एक इमारत आहे. या इमारतीच्या मालकाला ही इमारत पाडून नवीन बांधावी म्हणून म्हाडाच्या माध्यमातून पालिकेने परवानगी दिली होती. मात्र, मालकाने दुर्लक्ष केल्याने या इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळला.

या इमारतीमधून 12 जणांना गुरुवारी अग्निशमन दलाने शिडीद्वारे बाहेर काढले होते, तर 11 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापैकी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details