पूरग्रस्तांसाठी ३७२ निवारा केंद्रांची उभारणी; ४ लाख पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश
पश्चिम महाराष्ट्रातील पुरामध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी,रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील ७० तालुके बाधीत झाले आहेत. ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.आत्तापर्यंत ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश
मुंबई -पूर परिस्थितीमध्ये ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत ४ लाख ४८ हजार नागरिकांना हलवण्यात आले आहे. या पूरबाधित नागरिकांसाठी ३७२ तात्पुरते 'निवारा केंद्र' सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३२ पथकांसह आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्डची एकूण १०५ बचाव पथके कार्यरत असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.