मुंबई- गोरेगाव पिंपरी पाडा येथे महिनाभरापूर्वीच भिंत कोसळून ३१ जण दगावली होती. ही घटना ताजी असतानाच शहरात आज सतत पडत असलेल्या पावसामुळे दिंडोशी येथे दरड कोसळून ४ जण जखमी झाली आहेत. या चारही जणांवर जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिंडोशी येथे दरड कोसळून ४ जखमी, ट्रॉमामध्ये उपचार सुरू
दिंडोशी नुराणी मस्जिद जवळ राजीव गांधी नगर आहे. या ठिकाणी डोंगराला लागून झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या झोपड्यांवर सकाळी डोंगराचा काही भाग कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत.
एक आणि दोन जुलैच्या मध्यरात्री मलाड, पिंपरी पाडा आणि आंबेडकर नगर येथे भिंत कोसळली होती. या दुर्घटना स्थळापासून जवळच असलेल्या दिंडोशी नुराणी मस्जिद जवळ राजीव गांधी नगर आहे. या ठिकाणी डोंगराला लागून झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या झोपड्यांवर सकाळी डोंगराचा काही भाग कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत.
त्यांना बाहेर काढून जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. जखमींची नावे मोहम्मद शेख (१५), झुबेदा शेख (७०), अहमद शेख (१४), अब्दुल शेख (४२) असल्याची माहिती मिळाली आहे.