महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोरिवलीमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला; रहिवासी सुखरूप बाहेर - बोरिवलीमध्ये ४ मजली इमारत कोसळली

बोरिवलीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण झालेली ४ मजली इमारत उभी होती. मात्र, त्याठिकाणी अद्यापही काही कुटुंब वास्तव्यास होते. बुधवारी या इमारतीचा काही भाग कोसळला. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि महापालिकेचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बोरिवलीमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला

By

Published : Sep 18, 2019, 6:45 PM IST

Updated : Sep 18, 2019, 8:10 PM IST

मुंबई- बोरिवली पश्चिम परिसरात निर्मला सदन इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. अग्नीशमन दल व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत इमारत रिकामी केली आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

बोरिवलीमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला

बोरिवलीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण झालेली ४ मजली इमारत उभी होती. मात्र, त्याठिकाणी अद्यापही काही कुटुंब वास्तव्यास होते. बुधवारी या इमारतीचा काही भाग कोसळला. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि महापालिकेचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. आता महापालिकेचे अधिकारी व अग्निशमन दल घटनास्थळाचा आढावा घेत आहेत.

Last Updated : Sep 18, 2019, 8:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details