मुंबई:मुंबई आणि गोरखपूर (Mumbai to Gorakhpur) दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून उन्हाळी विशेष गाड्या (Summer Special Trains) २२ आणि २९ मे रोजी मध्य रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी गाडी सुटणार आहे. ही गाडी गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी १०.१० वाजता पोहोचेल. 01060 उन्हाळी विशेष गोरखपूर येथून दि. २३ ३० मे रोजी दुपारी 1 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २२.१५ वाजता पोहोचेल.
Summer Special Trains: मुंबई ते गोरखपूर दरम्यान ४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या - मुंबई ते गोरखपूर
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोईसाठी ६३६ उन्हाळी विशेष गाड्या (Summer Special Trains) सुरु केल्या आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि गोरखपूर (Mumbai to Gorakhpur) दरम्यान ४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, ललितपूर, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, पोखरायन, कानपूर, लखनौ, बाराबंकी, अयोध्या कॅंट, अयोध्या, मानकापूर, बभनान, बस्ती आणि खलीलाबाद येथे या गाडीला थांबे असणार आहेत.
विशेष ट्रेन क्रमांक 01059 साठी बुकिंग विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि संकेतस्थळावर सुरू झाली आहे. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया रेल्वेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा संबंधित ॲप डाउनलोड करावे. प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविडचे सगळे नियम पाळावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.