महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना अपडेट: महाराष्ट्रात रविवारी ३८७० नवे रुग्ण... १७० जणांचा मृत्यू

आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

3870-new-covid19-cases-reported-in-maharashtra-today
महाराष्ट्रात शनिवारी ३८७० नवे रुग्ण, १७० जणांचा मृत्यू

By

Published : Jun 21, 2020, 11:50 PM IST

Updated : Jun 22, 2020, 12:07 AM IST

मुंबई- राज्यभरात कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार वाढत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणिक नव्याने रुग्ण वाढत आहेत. त्यातच रविवारी ३८७० नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर १७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर १५९१ रुग्णांनी रविवारी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात १७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत.

उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू- ठाणे-७० (मुंबई ४१, ठाणे मनपा २९), नाशिक-८ (नाशिक ७, अहमदनगर १), पुणे-१४ (पुणे १४), औरंगाबाद-१ (औरंगाबाद १), लातूर-१ (लातूर १), अकोला-७ (अकोला ४, अणरावती १, बुलढाणा १, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७० झाली आहे.

Last Updated : Jun 22, 2020, 12:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details