नवी मुंबई - महानगरपालिका आणि स्टर्लिंग इन्स्टिट्युट नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवी मुंबई युनायटेड रन' या संकल्पनेवर आधारित नवी मुंबई महापौर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. देशभरात आयकॉनिक म्हणून नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीसमोर या रनला सुरुवात झाली. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला.
एकात्मतेचे दर्शन घडवत महापौर मॅरेथॉनमध्ये धावले ३५०० हून अधिक नागरिक - kilometer
देशभरात आयकॉनिक म्हणून नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीसमोर या रनला सुरुवात झाली. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला.
यावेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, सभागृह नेते रवींद्र इथापे, परिवहन समितीचे सभापती रामचंद्र दळवी, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती मुनवर पटेल व उपसभापती गिरीश म्हात्रे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, गणेश म्हात्रे, विनोद म्हात्रे, सलुजा सुतार, स्टर्लिंग इन्स्टिट्यूच्या सचिव पूर्वा वळसे-पाटील, खजिनदार अविनाश शिंदे, सदस्य डॉ. अशोक पाटील आदी उपस्थित होते. या रनमध्ये सहभागी होण्यासाठी नवी मुंबईसह इतरही शहरांतूनही नागरिक सहभागी झाले होते. प्रो कबड्डीमधील स्टार खेळाडू रिशांक देवाडिगा, विशाल माने, निलेश सोळुंखे उपस्थित होते.
या मॅरेथॉनमधील २१ कि.मी. (हाफ मॅरेथॉन) आणि १० कि.मी. अंतराच्या पुरूष, महिला गटाच्या स्पर्धेत अत्याधुनिक टायमिंग चीपचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे ५ कि.मी., ३ कि.मी. आणि १ कि.मी. अंतराची शालेय गटासाठी आयोजित केली होती. खुल्या पुरूष गटात २१ किमीचे अंतर १ तास १२ मिनिट ४९ सेकंदात पूर्ण करून कुरूई कोईच हाफ मॅरेथॉनचा विजेता ठरला. खुल्या महिला गटात १ तास ४१ मिनिट ३६ सेकंदात २१ किमी अंतर पूर्ण करून वंदना अहिरे महिला हाफ मॅरेथॉन विजेती ठरली. पुरूष गटात अविनाश पवार व अनिल कोरवी त्याचप्रमाणे महिला गटात रिझवाना अनुप व शिंजनी मिओगी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सर्व विजेत्यांना मेडल्ससह रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात आली. १० किमी अंतराच्या स्पर्धेमध्ये पुरूष गटात दिनेश म्हात्रे, आनंद सुरवडे, नितेंद्र पोर्लेकर तसेच महिला गटात कविता भोईर, शितल तिवारी, निर्मला होसाल्ली अनुक्रमे ३ क्रमांकाचे मानकरी ठरले.
५ किमी अंतराच्या स्पर्धेतील मुलांमध्ये जयप्रकाश यादव, शिरीष पवार व पार्थ पोळ यांनी त्याचप्रमाणे निकिता मोर्ले, तन्वी कदम, समिता सचदेव यांनी मुलींच्या गटात अनुक्रमे ३ क्रमांक पटकावले. ३ किमी अंतराच्या स्पर्धेतील मुलांच्या व मुलींच्या गटातील पहिल्या ३ क्रमांकांची ६ पारितोषिके आंबेडकर नगर, रबाळे येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपादन करत आपली छाप उमटवली. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये निखील गवळी, तुषार कोठाल, ओमप्रकाश पाल तसेच विद्यार्थिनींमध्ये साक्षी जाधव, काजल शेख व वृषाली गवई यांचा अनुक्रमे ३ क्रमांकांमध्ये समावेश होता.
१ किमी अंतराच्या १४ वर्षाखालील मुलांच्या गटातही महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, आंबेडकरनगर येथील रबाळेचे विद्यार्थी वैभव मोरे, आदित्य भारती व इमाम बाबा शेख अनुक्रमे ३ क्रमांकांचे विजेते ठरले. मुलींच्या गटात राधिकाबाई मेघे विद्यालय, ऐरोलीच्या विद्यार्थिनी श्रावणी गुरव, तन्वी माने व सिध्दी वेजारे या ३ क्रमांकांवर विजयी झाल्या. या मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभागी होत रन पूर्ण करणाऱ्या धनराज गरड, दयानंद निमकर, तुषार पवार, शिरीष आरदवाड, शंकर पवार, संजय देसाई, प्रवीण गाढे, बाळकृष्ण पाटील, प्रल्हाद खोसे या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे या मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन करणारे क्रीडा विभागाचे उपआयुक्त नितीन काळे व स्टर्लिंग इन्स्टिट्युटचे अमरजीत खराडे यांचाही सन्मान करण्यात आला. अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.