मुंबई:मध्य रेल्वेला यंदा ७ हजार २५१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यात पाच नव्या मार्गासाठी एक हजार ४५५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. ज्यात अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या २५० किलोमीटरच्या नवीन मार्गिकेच्या कामासाठी यंदा ५७६ कोटी रुपये, वर्धा ते नांदेड (व्हाया यवतमाळ-पसुद) या २७०किलोमीटर मार्गाला ८२० कोटी रुपये, सोलापूर -उस्मानाबाद व्हाया तुळजापूर या ८४ किलोमीटर मार्गाला १० कोटी, धुळे-नंदुरबार या ५०किलोमीटर रेल्वे मार्गाला ५० कोटी आणि कल्याण - मुरबाड व्हाया उल्हासनगर २८ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला ५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पायभूत सुविधेसाठी यंदाचा अर्थसंकल्पात सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १०,११,१२आणि १३ वर २४ डब्याची गाडी उभी करण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याकरिता २० कोटी, एलटीटी काेचिंग डेपाे १० काेटी, पनवेल-कळंबाेली काेचिंग टर्मिनसच्या पहिल्या टप्यासाठी २० काेटीची तरतूद करण्यात आली आहे.
या नविन रेल्वे लाईन साठी तरतूद
- अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ २५०किमी- ५६७ काेटी
- वर्धा-नांदेड(व्हाया यवतमाळ-पसुद)२७०किमी-१०कोटी
- साेलापूर-उस्मानाबाद व्हाया तुळजापुर ८४ किमी- ५०कोटी
या रेल्वे मार्गाचे होणार दुहेरीकरण
- कल्याण-कसारा ३ री रेल्वे लाईन-६८.६२ किमी- १६० कोटी
- वर्धा-नागपुर ३ री लाईन- ७६.३ किमी- ८७ कोटी
- वर्धा-बल्लारशहा ३ री लाईन-१३२ किमी-३०५कोटी
- जळगाव-भुसावळ ४थी लाईन-२४.४६ किमी- ५५ कोटी
- इटासरी-नागपुर २८०किमी- ६१० काेटी
- पुणे-मिरज-लोढा दुहेरीकरण ४६७किमी- १५६७ काेटी
- दौेण्ड-मनमाड दुहेरीकरण २४७.५०किमी-५०० कोटी
- मनमाड-जळगाव ३री लाईन-१६०किमी-२०५कोटी
Railway Budget : ६ हजार १४२ किलाेमीटर लांबीच्या ३५ नविन रेल्वे लाईन टाकणार
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांकरिता (Railway projects in Maharashtra) अर्थसंकल्पात (Union Budget 2022) ११ हजार ९०३ काेटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात ६ हजार १४२ किलाेमीटर लांबीच्या (6 thousand 142 km length) ३५ नविन रेल्वे लाईन (35 new railway lines) टाकण्यात येणार आहे. मध्य रेल्वेला ७ हजार २५१ कोटी आणि पश्चिम रेल्वेला ९ हजार १४९ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार आहे.
रेल्वे प्रकल्पासाठी निधी