महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात गुरुवारी 3 हजार 661 बाधितांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर 52.42 टक्के - महाराष्ट्र कोरोना एकूण रुग्ण

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १ लाख ४७ हजार ७४१ नमुने पॉझिटिव्ह (१७.४२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५६ हजार ४२८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात गुरुवारी १९२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत.

health minister rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Jun 26, 2020, 12:12 AM IST

मुंबई - देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात गुरुवारी ३ हजार ६६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत बरे होणाऱ्यांची एकूण संख्या ७७ हजार ४५३ झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.४२ टक्के इतके झाले आहे. यासोबतच गुरुवारी राज्यात ४ हजार ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले. सध्या राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर (अॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १ लाख ४७ हजार ७४१ नमुने पॉझिटिव्ह (१७.४२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५६ हजार ४२८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात गुरुवारी १९२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ टक्के इतका आहे. मागील ४८ तासात झालेले १०९ मृत्यू झाले आहेत. हे मुंबई मनपा - ५८, ठाणे मनपा - ३, नवी मुंबई मनपा - १, भिवंडी-निजामपूर मनपा - १, मीरा-भाईंदर मनपा - १, वसई-विरार मनपा - २, रायगड - १, जळगाव मनपा - १, जळगाव - ४, नंदूरबार - १, पुणे - १, पुणे मनपा - १६, पिंपरी-चिंचवड मनपा - ४, सातारा - १, औरंगाबाद - २, औरंगाबाद मनपा - ८, अकोला - १, अकोला मनपा - १, बुलढाणा - १ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील असून इतर राज्यातील २ मृत्यूंचा समावेश आहे.

  • राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील -

मुंबई: बाधीत रुग्ण- (७०,८७८), बरे झालेले रुग्ण- (३९,१४९), मृत्यू- (४०६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७,६५९)
ठाणे: बाधीत रुग्ण- (२९,४८८), बरे झालेले रुग्ण- (१२,४२४), मृत्यू- (८१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६,२५३)
पालघर: बाधीत रुग्ण- (४२६३), बरे झालेले रुग्ण- (११८८), मृत्यू- (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९७६)
रायगड: बाधीत रुग्ण- (३०८५), बरे झालेले रुग्ण- (१८२०), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (११६९)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (५२९), बरे झालेले रुग्ण- (३७४), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३०)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१४७), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९)
पुणे: बाधीत रुग्ण- (१८,०१५), बरे झालेले रुग्ण- (९७०६), मृत्यू- (६५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७६५०)
सातारा: बाधीत रुग्ण- (८९१), बरे झालेले रुग्ण- (६७३), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७५)
सांगली: बाधीत रुग्ण- (३२०), बरे झालेले रुग्ण- (१९४), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११७)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (७७४), बरे झालेले रुग्ण- (७००), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (२४४०), बरे झालेले रुग्ण- (१३२१), मृत्यू- (२३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८८३)
नाशिक: बाधीत रुग्ण- (३२७६), बरे झालेले रुग्ण- (१७७३), मृत्यू- (१९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३०९)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (३०२), बरे झालेले रुग्ण- (२३६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)
जळगाव: बाधीत रुग्ण- (२६५२), बरे झालेले रुग्ण- (१३६१), मृत्यू- (२०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०८७)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (९०), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
धुळे: बाधीत रुग्ण- (६१५), बरे झालेले रुग्ण- (३७२), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९४)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (४०८४), बरे झालेले रुग्ण- (२०५०), मृत्यू- (२११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८२३)
जालना: बाधीत रुग्ण- (४११), बरे झालेले रुग्ण- (२८२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११७)
बीड: बाधीत रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)
लातूर: बाधीत रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१६५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३)
परभणी: बाधीत रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (२६५), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
नांदेड: बाधीत रुग्ण- (३०४), बरे झालेले रुग्ण (२२५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६८)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१४०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२)
अमरावती: बाधीत रुग्ण- (४८६), बरे झालेले रुग्ण- (३३२), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३०)
अकोला: बाधीत रुग्ण- (१३५२), बरे झालेले रुग्ण- (८२७), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५३)
वाशिम: बाधीत रुग्ण- (८६), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१८१), बरे झालेले रुग्ण- (१३१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण- (१७३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९७)
नागपूर: बाधीत रुग्ण- (१४१८), बरे झालेले रुग्ण- (९६५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४०)
वर्धा: बाधीत रुग्ण- (१५), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)
भंडारा: बाधीत रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (१०३), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (६५), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (६०), बरे झालेले रुग्ण- (४७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१२१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८)
एकूण: बाधीत रुग्ण-(१,४७,७४१), बरे झालेले रुग्ण- (७७,४५३), मृत्यू- (६९३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टीव्ह रुग्ण-(६३,३४२)

(गुरुवारी राज्यात एकूण नोंदविलेल्या १९१ मृत्यूंपैकी १०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ८३ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील - ४०, ठाणे जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत मनपामधील ३१, पालघर -४, सोलापूर -४, मालेगाव – १, यवतमाळ - १, जळगाव – १ आणि पुणे - १ यांचा समावेश आहे. हे ८३ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ABOUT THE AUTHOR

...view details