मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. आज मुंबईत कोरोनाचे 328 नवे रुग्ण आढळून आले असून 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही गेल्या दहा महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा -अर्थसंकल्प २०२१ : ..तर नागरिकांकडे आणखीन पैसा राहिला असता - अर्थतज्ञ जी. चंद्रशेखर
कोरोना रुग्णांची आकडेवारी
मुंबईत आज 328 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 9 हजार 297 वर पोहचला आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 359 वर पोहचला आहे. 460 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 91 हजार 373 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5 हजार 646 सक्रिय रुग्ण आहेत.