महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या लढ्यात ३१ पोलिसांचा मृ्त्यू; 1 हजार 499 पोलिसांवर उपचार सुरू

कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यामध्ये पोलीस विभाग जीव धोक्यात घालून काम करत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात 31 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 499 पोलिसांवर राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Maharashtra Police
महाराष्ट्र पोलीस

By

Published : Jun 5, 2020, 9:27 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात 31 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 499 पोलिसांवर राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात १९५ पोलीस अधिकारी व १ हजार ३०४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांमध्ये मुंबईतील-१९, पुणे-२, सोलापूर शहर-२, नाशिक ग्रामीण-३, एटीएस-१, मुंबई रेल्वे-१, ठाणे ग्रामीण-२, जळगाव ग्रामीण-१ समावेश आहे. राज्यभरात लॉकडाऊन काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 258 घटना घडल्या असून या प्रकरणी आत्तापर्यंत 838 जणांना अटक करण्यात आली आहे.

कोविड-19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 203 कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले आहेत. अवैध वाहतुकीच्या 1 हजार 330 प्रकरणात 23 हजार 827 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 79 हजार 802 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या काळात तब्बल 6 कोटी 42 लाख 83 हजारांचा दंड पोलिसांनी जमा केला आहे. राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 22 हजार 772 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मुंबई वगळता राज्यात एतरत्र क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 706 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 46 घटना घडल्या आहेत.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आत्तापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ५३ हजार ४७७ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले आहेत. तर संपूर्ण राज्यात ५ लाख ६० हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. राज्यात परदेशी नागरिकांकाच्या व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे नोंदवले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details