महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Malegaon blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 30 साक्षीदार फितूर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ( Malegaon blast case ) तिसावा साक्षीदार फितूर झाला आहे. या प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्या संबंधित साक्षीदार फितूर झाला. या प्रकरणात साक्षीदार क्रमांक 286 फितूर झाला आहे

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 30 साक्षीदार फितूर
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 30 साक्षीदार फितूर

By

Published : Nov 15, 2022, 2:02 PM IST

Updated : Nov 15, 2022, 3:07 PM IST

मुंबई मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ( Malegaon blast case ) तिसावा साक्षीदार फितूर झाला आहे. या प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्या संबंधित साक्षीदार फितूर झाला. या प्रकरणात साक्षीदार क्रमांक 286 फितूर झाला आहे. या प्रकरणात यापूर्वी 29 साक्षीदार फितूर झाले होते. साक्षीदाराचे जबाब एटीएसने नोंदवला होता. आज न्यायालयासमोर फितूर म्हणून घोषित करण्यात आला आहे.

असा झाला हिंदू दहशतवाद शब्दाचा जन्म - देशात हिंदू दहशतवाद जन्माला आणणारा शब्द मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पासून अस्तित्वात आला होता. आतापर्यंत 28 जणांनी या खटल्यात साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सध्या एनआयएच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या सुनावणीतही एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने साक्ष बदलली होती.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण

काय आहे प्रकरण ? -29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

Last Updated : Nov 15, 2022, 3:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details