महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : नागपड्यात 30 लाखांचा मास्कचा साठा जप्त - नागपड्यात 30 लाखांचा मास्कचा साठा जप्त

बाजारात तुटवडा असलेल्या मास्कची साठेबाजी करून ती चढ्या भावात विकणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. मुंबईतील नागपाडा परिसरातील मदनपुरा पत्राचाळ येथील एका खोलीत छापा टाकून '3 प्लाय सर्जिकल मास्क'चे तब्बल 30 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचे 1 लाख 22 हजार 100 नग मास्क जप्त केले.

नागपड्यात 30 लाखांचा मास्कचा साठा जप्त
नागपड्यात 30 लाखांचा मास्कचा साठा जप्त

By

Published : Mar 31, 2020, 7:46 PM IST

मुंबई - बाजारात तुटवडा असलेल्या मास्कची साठेबाजी करून ती चढ्या भावात विकणाऱ्या आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक 3ने अटक केली आहे. मुंबईतील नागपाडा परिसरातील मदनपुरा पत्राचाळ येथील एका खोलीत छापा टाकून '3 प्लाय सर्जिकल मास्क'चे तब्बल 30 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचे 1 लाख 22 हजार 100 नग मास्क जप्त केले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाजारात मास्क व 'हॅन्ड सॅनिटायझर'चा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारकडून 13 मार्च रोजी मास्क व हॅन्ड सॅनिटायझर या अत्यावशक वस्तू असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर मास्क व हॅन्ड सॅनिटायझर हे ठरलेल्या भावात विकण्याची अधिसूचनाही जारी करण्यात आली. मात्र, असे असतानासुद्धा मुंबईतील नागपाडा परिसरात मास्कचा मोठ्या प्रमाणात साठा करून त्याची परवानगी नसतानाही चढ्या भावात विक्री करण्यात येत होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात मोहम्मद कासीम अन्सारी या आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे.

दरम्यान, मुंबई शहरात कलम 144 लागू असून संचारबंदी करण्यात आल्यानंतरही कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 1017 जणांवर कलम 188नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 856 जणांना अटकेनंतर जामिनावर सोडण्यात आले आहे. 92 जणांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले असून 69 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details