महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईमध्ये १२ लाखाचा ३० किलो गांजा जप्त, २ आरोपींना अटक - अमली पदार्थ विरोधी पथक

पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान १२ लाख रुपयांचा ३० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

Mumbai

By

Published : Mar 5, 2019, 3:04 PM IST

मुंबई- पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान १२ लाख रुपयांचा ३० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एका महिला आरोपीचा समावेश आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुंबईतील सायन ट्रँबे रोडवरील हाय अपार्टमेंट बसटॉपजवळ सापळा रचण्यात आला होता. घटनास्थळी पोलिसांनी मुक्ताबाई चव्हाण उर्फ अनिता (वय- ३०) महिलेला १५ किलो गांजासह अटक करण्यात आली आहे. महिलेची चौकशी करुन मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मोहमद इस्माईल अल्युमिया शेख (वय- ४०) याला अटक केली. त्याच्या घराच्या झडतीत १५ किलो गांजा जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी कर्नाटक राज्यातील बिदर तालुक्यातील राहणारे असून पोलिसांनी या प्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details