महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या उपचारासाठी राज्यातील 30 रुग्णालये विशेष म्हणून घोषीत - राजेश टोपे - कोरोनाच्या उपचारासाठी 30 रुग्णालये घोषीत

देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारसह आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Breaking News

By

Published : Apr 2, 2020, 11:59 PM IST

मुंबई - देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारसह आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टोपे यांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोनाच्या उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषीत केली असून, त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. २ हजार ३०५ खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या असल्याची माहितीही यावेळी टोपे यांनी दिली. या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे.

राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवतानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत.

Conclusion:

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details