महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात ३५८१ नवीन रुग्णांचे निदान; ५७ रुग्णांचा मृत्यू - Corona patient number Maharashtra

आज राज्यात ३ हजार ५८१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९ लाख ६५ हजार ५५६ वर पोहोचला आहे. राज्यात आज ५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

Corona Maharashtra
कोरोना महाराष्ट्र

By

Published : Jan 9, 2021, 10:07 PM IST

मुंबई -आज राज्यात ३ हजार ५८१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९ लाख ६५ हजार ५५६ वर पोहोचला आहे. राज्यात आज ५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५० हजार २७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५२ हजार ९६० अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७ टक्के -

राज्यात आज २ हजार ४०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आजपर्यंत एकूण १८ लाख ६१ हजार ४०० कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३३ लाख ३८ हजार ४८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ६५ हजार ५५६ नमुने म्हणजेच, १४.७४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ३४ हजार ५४५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून, राज्यात एकूण ५२ हजार ९६० अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जूनदरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यातही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२, १९ ऑक्टोबरला ५९८४, २६ ऑक्टोबरला, ७ नोव्हेंबरला ३९५९, १० नोव्हेंबरला ३७९१, १५ नोव्हेंबरला २५४४, १६ नोव्हेंबरला २५३५, १७ नोव्हेंबरला २८४०, २० नोव्हेंबरला ५६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा -नामांतरापेक्षा रुग्णालय सज्ज केली असती तर त्या बालकांचे जीव वाचले असते - संजय निरुपम

ABOUT THE AUTHOR

...view details