मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बंगल्याबाहेरील 3 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या तीन पोलिसांना सांताक्रूझमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या बंगल्याजवळील चहावाला व नंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील महिला पोलिसाला कोरोनाची लागण झाली होती'
Coronavirus : मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेरील 3 पोलिसांना कोरोनाची लागण - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे पूर्व कलानगर येथे 'मातोश्री' हे खासगी निवासस्थान आहे. या निवासस्थानाबाहेर दिवस रात्र पोलिसांचा पहारा असतो. काही दिवसांपूर्वी या बंगल्याजवळ असलेला चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे पूर्व कलानागर येथे 'मातोश्री' हे खासगी निवासस्थान आहे. या निवास स्थानाबाहेर दिवस रात्र पोलिसांचा पाहरा असतो. काही दिवसांपूर्वी या बंगल्याजवळ असलेला चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.
या चहावाल्याकडे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील पोलीस चहा पिहायला जात असल्याने तब्बल 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या पोलिसांच्या जागी नवीन पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामधील 3 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.