मुंबई - गोवंडी पूर्व येथे सेप्टीक टँकची स्वच्छता करत असताना तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका खासगी इमारतीचे ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. दुपारी 12 च्या दरम्यान ही घटना समोर आली.
'मोरया' इमारतीच्या ड्रेनेजची स्वच्छता करण्यासाठी एक कामगार उतरला होता. गटारात ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने संबंधित कामगार चक्कर येऊन पडला. त्याला वाचवण्यासाठी आणखी दोघे उतरले. तेही चक्कर आल्याने गटारातच पडले. यानंतर त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.