मुंबई:मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकार्यांनी शारजाहून आलेल्या केनियन महिलांच्या गटाकडून कॉफी पावडरच्या बाटल्यांमध्ये लपवलेले ३.८० किलो सोने आणि काही वैयक्तिक वस्तू जप्त केल्या आहेत.
Gold seized : कॉफीच्या बाटल्यांमध्ये लपवुन आणलेले ३.८० किलो सोने जप्त, केनियन महिलेस अटक - Investigation of Kenyan women
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Mumbai International Airport) सीमाशुल्क अधिकार्यांनी (Customs officials) शारजाहून आलेल्या केनियन महिलांच्या गटाकडून कॉफी पावडरच्या बाटल्यांमध्ये लपवलेले ३.८० किलो सोने आणि काही वैयक्तिक वस्तू जप्त (3.80 kg gold seized) केल्या आहेत. १८ केनियन महिलांची तपासणी (Investigation of 18 Kenyan women) केली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका केनियन महिलेला अटक (Kenyan women arrested) करण्यात आली आहे

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, विमानतळावर १८ केनियन महिलांचा गट उतरला संशयावरून त्यांची तपासणी केली. यावेळी त्याच्या सामानात बार, वायर आणि पावडरच्या स्वरूपातील कॉफी बाटल्या, आतल्या कपड्यांचे अस्तर, पादत्राणे आणि मसाल्याच्या बाटल्यां होत्या सखोल तपासणी नंतर त्यातील काॅफीच्या बाटल्यात सोने लपवल्याचे लक्षात आले. सगळे मिळून ३.८० किलो सोने सापडले ते जप्त करण्यात आले आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत काही कोटीत आहे. या प्रकरणी एका केनियन महिलेलाअटक करण्यात आली आहे. तर इतरांना सोडून देण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
हेही वाचा :Year in Review 2021 : मुंबईतील गुन्हेगारी जगतातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा...