महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिघा आरोपींना करणार न्यायालयात हजर

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. या प्रकरणाची चौकशी आता क्राईम ब्रांच करत आहे. दरम्यान, या तिनही आरोपींना थोड्याच वेळात सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिघा आरोपींना करणार न्यायालयात हजर

By

Published : May 31, 2019, 1:05 PM IST

मुंबई- डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. या प्रकरणाची चौकशी आता क्राईम ब्रांच करत आहे. दरम्यान, या तिनही आरोपींना थोड्याच वेळात सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

डॉ. पायल तडवी या नायर रूग्णालयात पीजीच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या. रूग्णालच्याच आवारातील वसतीगृहात त्या राहत होत्या. पण, तिथे पहिल्या दिवसापासून डॉ. आहुजा, डॉ. मेहेर आणि डॉ. खंडेलवाल यांनी जातीवरून पायलला त्रास देण्यात सुरूवात केली, अशी तक्रार डॉ. पायल यांच्या आईने केली आहे. याबाबत पायल यांनी रूग्णालयाचे अधिष्ठाते, वसतीगृहाच्या वॉर्डन आणि व्याख्याते यांच्याकडे तक्रार केली होती. पण, तरीही छळ न थांबल्याने पायलने आत्महत्या करत आपले जीवन संपवले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

बुधवारी डॉ. पायलने वसतीगृहातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनतर आरोपी फरार होते. दरम्यान, पोलिसांनी या तिघी आरोपींना २७ तारखेला पकडले व २८ तारखेला कोर्टात सुनावणीसाठी हजर केले. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर आज पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details