मुंबई -राज्यात आज २९४० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. राज्यात आज ८५७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ३२ हजार ७७७ नमुन्यांपैकी २ लाख ८८ हजार १९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर ४४ हजार ५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८ हजार ४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात ६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण मृतांची संख्या १५१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापुरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद शहरात ३, साताऱ्यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३७ पुरुष तर २६ महिला आहेत. यापैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २८ रुग्ण आहेत, ३१ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत, तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील -
मुंबई महानगरपालिका: २७,२५१ (९०९)
ठाणे: ३६६ (४)
ठाणे मनपा: २२३४ (३३)
नवी मुंबई मनपा: १७७६ (२९)
कल्याण डोंबिवली मनपा: ७२७ (७)
उल्हासनगर मनपा: १४४ (३)
भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३)
मीरा भाईंदर मनपा: ३८८ (४)
पालघर:१०७ (३)
वसई विरार मनपा: ४५१ (१४)
रायगड: २९९ (५)
पनवेल मनपा: २८२ (१२)
ठाणे मंडळ एकूण:३४,१०७ (१०२७)
नाशिक: ११५
नाशिक मनपा: ९३ (२)
मालेगाव मनपा: ७१० (४४)
अहमदनगर: ४९ (५)
अहमदनगर मनपा: २२
धुळे: १७ (३)
धुळे मनपा: ८० (६)
जळगाव: २८६ (३६)
जळगाव मनपा: १०९ (५)
नंदूरबार: ३२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १५१३ (१०३)
पुणे: २८३ (५)
पुणे मनपा: ४४९९ (२३१)
पिंपरी चिंचवड मनपा: २११ (७)
सोलापूर: १० (१)
सोलापूर मनपा:५२२ (३२)
सातारा: २०४ (४)
पुणे मंडळ एकूण: ५७२९ (२८०)
कोल्हापूर:१७५ (१)
कोल्हापूर मनपा: २०
सांगली: ६२