मुंबई :माटुंगा परिसरामध्ये एका 28 वर्षीय तरुणाची हत्या (youth beaten to death) केल्याप्रकरणी 3 जणांना अटक (accused arrested for Murder) करण्यात आली आहे. या तीन जणांपैकी एकाने रोखून बघितल्याच्या कारणावरून (Argument on grounds of staring) सुरू झालेल्या वादाचे शेवटी हत्येत पर्यवसन झाले आहे. त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ पसरली आहे. रविवार 23 ऑक्टोबरच्या सकाळी मांटुगा परिसरातील एका रेस्टॉरंटजवळ हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली आहे. (Latest news from Mumbai) (Mumbai Crime)
Youth Beaten To Death : टक लावून पाहतो म्हणून २८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण; तिघांना अटक - तरुणाची हत्या
माटुंगा परिसरामध्ये एका 28 वर्षीय तरुणाची हत्या (youth beaten to death) केल्याप्रकरणी 3 जणांना अटक (accused arrested for Murder) करण्यात आली आहे. या तीन जणांपैकी एकाने रोखून बघितल्याच्या कारणावरून (Argument on grounds of staring) सुरू झालेल्या वादाचे शेवटी हत्येत पर्यवसन झाले आहे. त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ पसरली आहे.
भांडण, मारहाण आणि हत्या-मृत तरुण त्याच्या मित्रासोबत तेथे गेला होता. त्याचे आरोपींसोबत एकटक रोखून पाहिल्याच्या कारणावरून भांडण झाले. आरोपीने त्याच्या डोक्यावर बेल्टने मारहाण केली. त्यानंतर त्याला लाथा-बुक्क्यांनी मारून जबर मारहाण केल्याचेही शाहू नगर पोलिसांनी सांगितले आहे. मारहाणीनंतर तो तरुण जागीच बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळला. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
तिन्ही आरोपींना अटक-शाहू नगर पोलिस स्थानकामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 302 , 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.