महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासा! धारावीत आज 28 नवे रुग्ण, 6 वेळा आढळले 0 रुग्ण

धारावीत आज (24 एप्रिल) 28 नवे रुग्ण आढळले. यावरून धारावीतील रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्या धारावीत 944 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 24 डिसेंबर, 22 जानेवारी, 26 जानेवारी, 27 जानेवारी, 31 जानेवारी, 2 फेब्रुबारी या सहा दिवशी धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही.

Dharavi
Dharavi

By

Published : Apr 24, 2021, 7:22 PM IST

मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. मागील काही दिवस 70 हुन अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज (24 एप्रिल) धारावीत 28 नवे रुग्ण आढळून आल्याने धारावीतील रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे.

धारावीत 944 सक्रिय रुग्ण -

कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली होती. 2 फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात 334 रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात 7 ते 11 हजारावर गेली होती. धारावीतही काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. धारावीत 8 मार्चला दिवसभरात 18 रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. 18 मार्चला ही रुग्णसंख्या 30 वर पोहोचली होती. 11 एप्रिलला धारावीत 76 नवे रुग्ण आढळून आले होते. आज धारावीत 28 नवे रुग्ण आढळून आल्याने धारावीतील रुग्णसंख्या 6288 वर गेली आहे. त्यापैकी 5000 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 944 रुग्णांवर उपचार रुग्ण आहेत.

माहिममध्ये 2427 सक्रिय रुग्ण -

मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या हद्दीत धारावी, दादर, माहीम हे विभाग येतात. धारावी प्रमाणेच दादर आणि माहिममध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. दादरमध्ये आज 54 रुग्ण आढळून आले. आतापर्यंत एकूण 8599 रुग्ण आढळले. त्यातील 6208 रुग्णांनी कोरोनावर मात केली असुन 2391 उपचार घेत आहेत. माहीममध्ये आज 73 रुग्ण तर आतापर्यंत 7690 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 6142 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2427 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

धारावीत सहावेळा शून्य रुग्ण -

मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. दाटीवाटीने असलेली घरे, सार्वजनिक शौचालय यामुळे धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली होती. धारावीत 1 एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग हे चार टी मॉडेल राबवले. धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले होते. जुलै ऑगस्टनंतर धारावीतील दोन अंकी असलेली रुग्णसंख्या आणि सक्रिय रुग्णांची संख्या एक अंकावर आली होती. 24 डिसेंबर, 22 जानेवारी, 26 जानेवारी, 27 जानेवारी, 31 जानेवारी आणि 2 फेब्रुबारी या सहा दिवशी धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. या दिवशी शून्य रुग्णांची नोंद झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details