महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान 'बर्थडे बॉय'ची 7 ते 8 जणांच्या टोळक्याने केली हत्या - सेलिब्रेशन

मृत नितेश सावंतचे वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रेशन सुरू होते. सेलिब्रेशन दरम्यान काही मित्रांशी वादावादी झाली. तेव्हा सात ते आठ जणांनी मिळून नितेशच्या शरीरावर धार धार शस्त्राने वार करून हत्या केली.

बर्थडे बॉय'ची 7 ते 8 जणांच्या टोळक्याने केली हत्या

By

Published : Jul 29, 2019, 6:15 AM IST

Updated : Jul 29, 2019, 2:00 PM IST

मुंबई - घाटकोपर परिसरातील पंतनगर येथील साईबाबा उद्यानात काल रात्री नितेश प्रकाश सावंत (27) या युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने 7 ते 8 मित्रांनी हाणामारी करीत त्याची हत्या केली आहे. रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान नितेशची हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री मुंबईच्या घाटकोपर परिसरात घडली. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

बर्थडे बॉय'ची 7 ते 8 जणांच्या टोळक्याने केली हत्या


मृत नितेश सावंतचे वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रेशन सुरू होते. सेलिब्रेशन दरम्यान काही मित्रांशी वादावादी झाली. तेव्हा सात ते आठ जणांनी मिळून नितेशच्या शरीरावर धार धार शस्त्राने वार करून हत्या केली. पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मृताचा आरोपींशी वाद झाला होता. याच रागातून आरोपींनी त्या तरुणाची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पंतनगरच्या साईबाबा उद्यानात रविवारी सांयकाळी वाढदिवस साजरा करण्यात येत होता. यावेळी नितेशवर मित्रांनी धारधार हत्यारांनी वार केले, आणि त्याची हत्या केली. हत्या करणारे मित्र घटनास्थळावरून पसार झाले. यावेळी घटनेची माहिती पंतनगर पोलिसाना देण्यात आली. पोलिसांनी नितेश यास घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले,परंतू डॉक्टरांनी नितेश यास मृत घोषित केले.पोलिसानी नितेश याचा काही लोकांसोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले असल्याचे सांगितले.

नितेश सावंत याचा वाढदिवस शनिवारीच साजरा करण्यात आला होता. मात्र काही मित्रांनी तो रविवारी सांयकाळी साईबाबा उद्यानात साजरा केला. यात काही युवकांचा वाद झाला, आणि नितेश सावंतवर वार करण्यात आले. पोलिसानी हत्येचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी 2 ते 3 लोकांना ताब्यात घेतले असून, पंतनगर पोलीस अधीक तपास करीत आहेत.

Last Updated : Jul 29, 2019, 2:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details