मुंबई:26/11 Mumbai Attack:२६/११ दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मुंबई विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुद्धा या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धाजली तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई पोलीस आयुक्त, अधिकारी व कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?:या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही हृदयात आहेत. परंतु त्याबरोबर ज्या पद्धतीने त्या हल्लेखोरांचा चोख मुकाबला मुंबई पोलीस Mumbai Police तसेच केंद्रीय पोलीस यांनी केला त्यांना सलाम. हा हल्ला मुंबईवर नाही तर भारताच्या सार्वभौमत्वेवर होता. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी पाठवून हा हल्ला घडविण्यात आला होता.