महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मध्य रेल्वेच्या 260 विशेष गाड्या धावणार, आजपासून आरक्षण सुरू

सण-उत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेने तब्बल 260 उत्सव विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या गाड्यांमध्ये सर्वसामान्य डबे नसल्यामुळे केवळ आरक्षित प्रवाशांनाच प्रवास करण्यास परवानगी असणारआहे.

file photo
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 18, 2020, 7:04 AM IST

मुंबई- प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई-पुरी, गोरखपूर, हुब्बळी, हटिया, विशाखापट्टणम, रक्सौल, भुवनेश्वर आणि पुणे-संत्रागाची दरम्यान 260 पूजा/उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

तपशील खालीलप्रमाणे आहेत

लोकमान्य टिळक टर्मिनस- पुरी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (12 खेपा)

रेल्वे क्रमांक 02865 विशेष सुपरफास्ट साप्ताहिक 22 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पुरीला पोहोचेल.
रेल्वे क्र. 02866 विशेष सुपरफास्ट साप्ताहिक 20 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत दर मंगळवारी पुरी येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे व वेळः नियमित रेल्वे क्रमांक 22865/22866 लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस नुसार

संरचना - 1 प्रथम वातानुकूलित, 1 द्वितीय वातानुकूलित, 5 तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान आणि 6 द्वितीय आसन श्रेणी.

लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर विशेष दैनिक (84 फेऱ्या)

रेल्वे क्रमांक 05017 विशेष 22 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज सुटेल आणि दुसर्‍या दिवशी गोरखपूरला पोहोचेल.
रेल्वे क्रमांक 05018 विशेष 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत गोरखपूरहून दररोज सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे व वेळ - कसारा, इगतपुरी, देवळाली, नांदगाव, नेपानगर, जैतवार, बरूड, सुरगाव बंजारी, जसरा व दाभाौरा हि स्थानके वगळता प्रयागराज मार्गे असलेल्या नियमित गाडी क्रमांक 15017 / 15018 एलटीटी - गोरखपूर एक्सप्रेस प्रमाणे.

संरचना -2 द्वितीय वातानुकूलित, 2 तृतीय वातानुकूलित, 10शयनयान आणि 8 द्वितीय आसन श्रेणी.

मुंबई-गोरखपूर विशेष (12 फेऱ्या)

02597 विशेष 20 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत (6 फेऱ्या) दर मंगळवारी 8.30 वाजता गोरखपूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दुसर्‍या दिवशी 12.20 वाजता पोहोचेल.
02598 विशेष 21 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत (6 फेऱ्या) दर बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 13.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 6.35 वाजता गोरखपूरला पोहोचेल.

थांबे : कल्याण, भुसावळ, इटारसी, भोपाळ, झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद.

संरचना - 17 द्वितीय आसन श्रेणी.

लोकमान्य टिळक टर्मिनस-हुब्बळी विशेष (80 फेऱ्या)

रेल्वे नंबर 07318 विशेष 23ऑक्टोबर ते 1 डिसेंबर पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज सुटेल आणि दुसर्‍या दिवशी हुबळीला पोहोचेल.
रेल्वे क्रमांक 07317 विशेष 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत दररोज हुबळी येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे व वेळ: नियमित गाडी क्रमांक 17317/17318 एक्सप्रेस नुसार

संरचना- 1 द्वितीय वातानुकूलित, 1तृतीय वातानुकूलित, 6 शयनयान आणि 8 द्वितीय आसन श्रेणी.

लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया विशेष साप्ताहिक 12 फेऱ्या

गाडी क्र. 02811 विशेष 25 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी हटिया येथे पोहोचेल.
गाडी क्र. 02812 विशेष 23 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत हटिया येथून दर शुक्रवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे आणि वेळ - 02811 साठी इगतपुरी वगळता नियमित गाडी क्रमांक 12811/12812 एक्सप्रेस प्रमाणे.

संरचना - 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 15 शयनयान आणि 2 द्वितीय आसन श्रेणी.

लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम विशेष साप्ताहिक (12 फेऱ्या)

रेल्वे क्रमांक 02858 विशेष 27 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी सुटेल आणि विशाखापट्टणमला दुसर्‍या दिवशी पोहोचेल.
रेल्वे क्रमांक 02857 विशेष 25 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत विशाखापट्टणम येथून दर रविवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे व वेळ - नियमित गाडी क्रमांक 22847/22848 लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्सप्रेस प्रमाणे.

संरचना - 1 द्वितीय वातानुकूलित,2 तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान आणि 8 द्वितीय आसन श्रेणी.

मुंबई-रक्सौल विशेष साप्ताहिक (12 फेऱ्या)

02546 विशेष 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत (6 फेऱ्या) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी सुटेल व दुसर्‍या दिवशी रक्सौलला पोहोचेल.
02545 विशेष 22ऑक्टोबर ते 26 पर्यंत (6 फेऱ्या) रक्‍सौल येथून दर गुरुवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे व वेळ -नियमित गाडी क्रमांक 12545/ 12546 एक्सप्रेस प्रमाणे.

संरचना - 23 द्वितीय आसन श्रेणी.

लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर विशेष द्वि-साप्ताहिक (आढवड्यातून दोन) सुपरफास्ट (24 फेऱ्या)

रेल्वे क्रमांक 02879 विशेष द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट 24 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर पर्यंत दर बुधवार आणि शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी भुवनेश्वरला पोहोचेल.
रेल्वे क्रमांक 02880 विशेष द्वि - साप्ताहिक सुपरफास्ट 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत दर सोमवार आणि गुरुवारी भुवनेश्वर येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल

थांबे व वेळ - बेलपहाड वगळता नियमित रेल्वे क्रमांक12879/12880 लोकमान्य टिळक टर्मिनस - पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस प्रमाणे.

संरचना - 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 11शयनयान आणि 2 द्वितीय आसन श्रेणी.

पुणे-संत्रागाची विशेष साप्ताहिक (12 फेऱ्या)

रेल्वे क्रमांक 02818 विशेष साप्ताहिक सुपरफास्ट 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत दर सोमवारी पुण्याहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी संत्रागाचीला पोहोचेल.
रेल्वे क्र. 02817 विशेष साप्ताहिक सुपरफास्ट 24 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत दर शनिवारी संत्रागाची येथून सुटेल आणि तिसर्‍या दिवशी पुण्यात पोहोचेल.

थांबे व वेळ- नियमित रेल्वे क्रमांक 20821/20822 पुणे-संतरागाची सुपरफास्ट एक्सप्रेस प्रमाणे.

संरचना - 2 द्वितीय वातानुकूलित, 6 तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान.

रेल्वे क्र. 02865, 05017, 02598 आणि 07318 गाड्यांसाठी बुकिंग 18 ऑक्टोबरपासून व 02811, 02858, 02546, 02818 व 02879 या विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर व आयआरसिटीसीच्या वेबसाइटवर 20 ऑक्टोबरला सुरू होणार आहे.

केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा -परिवहन मंत्री अनिल परब यांची कोरोनावर मात

ABOUT THE AUTHOR

...view details