महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Special Trains : लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर दरम्यान 26 साप्ताहिक विशेष गाड्या सोडणार - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड्या सोडणार

रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर दरम्यान 26 साप्ताहिक विशेष गाड्या आणि पुणे ते विरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन दरम्यान 26 साप्ताहिक अशा एकूण 52 उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या दोन्ही ट्रेनची बुकिंग 17 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Special Trains
Special Trains

By

Published : Feb 16, 2023, 3:15 PM IST

मुंबई : ट्रेन क्रमांक 04152 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 8 एप्रिल ते 1 जुलै पर्यंत (13 ट्रिप) दर शनिवारी 17.15 वाजता कानपूर सेंट्रल येथून दुसऱ्या दिवशी 15.25 वाजता सुटेल. 04151 स्पेशल 7 एप्रिल ते 30 जून (13 ट्रिप) दर शुक्रवारी कानपूर सेंट्रल 15.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 14.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज आणि फतेहपूर या स्थानकावर थांबणार आहे. या ट्रेनमध्ये एक एसी - 2 टियर, 8 एसी - 3 टियर, 8 स्लीपर क्लास आणि 7 जनरल सेकंड क्लाससह 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन अशी डब्ब्यांची रचना आहे. दरम्यान, या दोन्ही ट्रेनची बुकिंग 17 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन: ट्रेन क्रमांक 01921 स्पेशल पुण्याहून 6 एप्रिल ते 29 जून पर्यंत (13 ट्रिप) दर गुरुवारी 15.15 वाजता वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शनला दुसऱ्या दिवशी 09.35 वाजता पोहोचेल. 01922 स्पेशल वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन दर बुधवारी 12.50 वाजता 5 एप्रिल ते 28 जून (13 ट्रिप) ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.35 वाजता पुण्याला पोहोचेल. ही ट्रेन दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, नर्मदापुरम, भोपाळ, विदिशा, बिना आणि ललितपूर या स्थानकावर थांबणार आहे. या ट्रेनमध्ये एक एसी 2-टायर, 5 एसी 3-टियर, 5 स्लीपर क्लास, 6 जनरल सेकंड क्लाससह 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन अशी डब्ब्यांची रचना असणार आहे.

17 फेब्रुवारी पासून तिकीट बुकिंग :लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर तसेच पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन या ट्रेनच्या तिकीट बुकिंगसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर 17 फेब्रुवारी रोजी विशेष शुल्कावर उघडतील. या स्पेशल ट्रेनच्या थांब्या आणि वेळेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES अॅप डाउनलोड करावे असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या ट्रेनमध्ये एक एसी 2-टायर, 5 एसी 3-टियर, 5 स्लीपर क्लास, 6 जनरल सेकंड क्लाससह 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन अशी डब्ब्यांची रचना असणार आहे.

हेही वाचा :मुलीचा वस्तू मानून आर्थिक फायद्यासाठी वापर वेदनादायी - उच्च न्यायालयाची टिप्पणी

ABOUT THE AUTHOR

...view details