महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा धसका : आखाती देशातून 26 हजार भारतीय मुंबईत परतणार, होम क्वारेंटाईनसाठी बिल्डरांच्या रिक्त इमारतींचा वापर - प्रविणसिंह परदेशी

कोरोनाचा प्रसार सर्वत्र होत आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून ३१ मार्च दरम्यान आखाती देशातून २६ हजार भारतीय परत येणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला देण्यात आली आहे. या नागरिकांद्वारे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारेंटाइनमध्ये ठेवले जाणार आहे.

कोरोनाचा धसका
कोरोनाचा धसका

By

Published : Mar 19, 2020, 11:02 AM IST

Updated : Mar 19, 2020, 12:41 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रसार सर्वत्र होत आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून ३१ मार्च दरम्यान आखाती देशातून २६ हजार भारतीय परत येणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला देण्यात आली आहे. या नागरिकांद्वारे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारेंटाइनमध्ये ठेवले जाणार आहे. यासाठी क्रीडाई या बिल्डर असोसिएशनने आपल्या बांधून तयार असलेल्या सर्व इमारती पालिकेच्या ताब्यात देण्याचे मान्य केले असल्याचे पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सांगितले.

प्रविणसिंह परदेशी, आयुक्त मुंबई महापालिका

कोरोना हा विषाणू देशाबाहेरून आलेल्या प्रवाशांमधून पसरत आहे. हा विषाणू सध्या प्रवाशांच्या सहवासात असलेल्या लोकांमध्ये पसरल्याचे दिसत आहे. पुढे स्टेज ३ मध्ये हा विषाणू कोनामध्येही पसरू शकतो. यासाठी परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना कोरोनाची लागण झाली असल्यास कस्तुरबामध्ये ठेवले जात आहे. तर, इतरांना सेव्हन हिल किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये १४ दिवस होम क्वारेंटाइन केले जात आहे, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.

कोरोना सर्व जगभरात पसरत असल्याने आखाती देशात असलेल्या भारतीय नागरिकांनी आपल्याला पुन्हा भारतात आणण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. असे सुमारे २६ हजार भारतीय नागरिक पुन्हा आपल्या देशात येणार आहेत. या नागरिकांची विमानतळावर तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन करावे लागणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी ज्या नागरिकांचे मुंबईत घर आहे त्यांना घरी होम क्वारंटाइनमध्ये ठेवले जाणार आहे. तर, इतरांना होम क्वारेंटाइन करता यावे म्हणून शहरातील क्रीडाई या बिल्डर असोसिएशनबरोबर बोलणी करण्यात आली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात इमारती रिक्त आहेत. त्यामध्ये या नागरिकांना होम क्वारंटाइन केले जाईल. या इमारतींमध्ये सीएसआर फंडमधून लागणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आयुक्तांनी सांगितले.

काय केले जाणार -

अंधेरी सेव्हन हिल रुग्णालयात ३०० ते ४०० खाट असून ते १ हजार केले जात आहेत. मुंबई महापालिकेच्या इंजिनियरना ट्रेनिंगसाठी नुकतेच पवई येथे उभारण्यात आलेले केंद्र होम क्वारंटाइन केंद्र म्हणून सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी असलेल्या कॉन्फरस रुममध्ये सुमारे १०० खाट तयार ठेवण्यात आल्या आहेत. विमानतळावरुन येणाऱ्यांना या ठिकाणी होम क्वारंटाइन केले जाईल. जे आखाती देशातून येणार आहेत त्यांना याच ठिकाणी आणि बिल्डरांच्या रिक्त इमारतीत होम क्वारंटाइन केले जाईल. त्यांना इतर ठिकाणी विमानाने जाण्यास बंदी घातली जाईल. त्यांना सार्वजनिक वाहातुकीची साधने वापरण्यास बंदी असेल. त्यांना खासगी वाहतुकीच्या वाहनांनी या होम क्वारंटाइन केंद्रांवर आणले जाईल. यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांचा मुंबईकरांशी थेट संपर्क येणार नाही.

हेही वाचा -राज्यात आणखी २ कोरोनाग्रस्त आढळले, एकूण आकडा ४७ वर

हेही वाचा -शेअर बाजाराची घसरगुंडी थांबेना; सेन्सेक्स ३८ महिन्यांच्या निचांकी पातळीवर

Last Updated : Mar 19, 2020, 12:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details