महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोविंदांसाठी आनंदाची बातमी; मंत्री संजय बनसोडेंची मोठी घोषणा - प्रो गोविंदा स्पर्धा महाराष्ट्र

राज्य सरकारच्या वतीने या वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या गोविंदा दहीहंडीसाठी सुमारे 26 लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. गोविंदांच्या सुरक्षेसाठी दहा लाखाचा विमा काढण्यात आल्याची माहिती राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

Sanjay Bansode On Prof Govinda
संजय बनसोडे

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 8:59 PM IST

प्रो गोविंदा स्पर्धेविषयी बोलताना संजय बनसोडे

मुंबई :राज्यातील दहीहंडी या पारंपरिक उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. त्या पाठोपाठ आता गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी पासून प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. यासाठी राज्यभरातील गोविंदा पथकांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते. 197 गोविंदांनी या गोविंदा स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला आहे. प्राथमिक फेरीनंतर अंतिम फेरीत केवळ 16 गोविंदा पथकांना स्थान दिले जाणार आहे. वरळी येथील एनएससीच्या डोममध्ये 31 ऑगस्टला ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचा थरार सर्व मुंबईकरांना अनुभवता येणार आहे.

26 लाख रुपयांची बक्षिसे :या प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या गोविंदा पथकांना मोठ्या रकमेची बक्षीस देण्यात येणार आहेत. गोविंदा दहीहंडी स्पर्धेच्या विजेत्या पथकाला अकरा लाख रुपयांचे पहिले बक्षीस देण्यात येणार आहे. दुसऱ्या विजेत्याला सात लाख रुपयांचे बक्षीस तिसऱ्या विजेत्या दहीहंडी पथकाला पाच लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. चौथे उत्तेजनार्थ बक्षीस तीन लाख रुपयांचे असणार आहे. या प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि बक्षीसासाठी राज्याच्या उद्योग विभागाने मदत केली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती मंत्री बनसोडे यांनी दिली आहे.


गोविंदा सुरक्षेसाठी विमा :या प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा काढण्यात येणार असून 50,000 गोविंदांचा दहा लाख रुपयांचा विमा काढण्यात येणार आहे. त्यामुळे या गोविंदा पथकांना विम्याचे संरक्षण राज्य सरकारच्या वतीने दिले जाणार आहे. त्याचबरोबर जर एखाद्या गोविंदाचा या स्पर्धेदरम्यान अपघाताने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती संजय बनसोडे यांनी दिली आहे. राज्यात पहिल्यांदाच प्रो गोविंदाचा थरार नागरिकांना अनुभवता येणार आहे. या गोविंदा पथकांना संरक्षण मिळावे आणि प्रोत्साहन पर मिळावे यासाठीच राज्य सरकारच्या वतीने या प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे, अशी माहिती मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

हेही वाचा:

  1. Dahi Handi Pro Govin? क्रीडाचा दर्जा मिळाल्यानंतर यंदा प्रथमच जन्माष्टमीनिमित्त 'प्रो गोविंदा' स्पर्धा, सरकार देणार 'इतक्या' लाखांची बक्षिसे
  2. 'इंडिया' लोगोत देशाच्या स्वातंत्र्याचा, एकतेचा व स्वाभिमानाचा रंग असणार - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details