महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांच्या वेतनात 25 टक्के कपात? पूर्ण पगार देण्याची भाजपची मागणी - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पोलीस खात्याकडून राज्याच्या कोष विभागात पाठवण्यात आलेली वेतनाची बिले ही 25 टक्के कपात करुन पाठविण्यात आली असल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. याची माहिती घेऊन शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

police salaries
पोलिसांच्या वेतनात 25 टक्के कपात

By

Published : Apr 7, 2020, 3:26 PM IST

Updated : Apr 7, 2020, 4:34 PM IST

मुंबई- सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या पोलिसांच्या वेतनात 25 टक्के कपात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रहिताच्या दृष्टीने आपली सेवा देणाऱ्या पोलिसांच्या वेतनात कोणतीही कपात न करता त्यांना पूर्ण वेतन देण्याची मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

पोलिसांच्या वेतनात कपात केली जाणार नाही, असे शासनाने जाहीर केले असले, तरी अद्याप पोलिसांचे पगार झालेले नाहीत. पोलीस खात्याकडून राज्याच्या कोष विभागात पाठवण्यात आलेली वेतनाची बिले ही 25 टक्के कपात करुन पाठविण्यात आली असल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. याची माहिती घेऊन शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

पूर्ण पगार देण्याची भाजपची मागणी

त्यांनी पत्रात म्हटले आहे की, एकतर अद्याप पोलिसांना पगार मिळालेले नाहीत आणि जे मिळतील ते 25 टक्के कपात करुन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी स्वतः तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोना आणि त्यामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीत पोलीस आपला जीव धोक्यात घालून दिवस-रात्र काम करत आहेत. अशावेळी त्यांचे मनोबल खच्चीकरण होणार नाही, याकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.

त्यामुळे कोणत्याही प्रकारे प्रशासकीय विलंब न करता व कपात न करता पोलिसांचे पूर्ण पगार तातडीने देण्यात यावेत, अशी विनंती आमदार शेलार यांनी या पत्रात केली आहे. दरम्यान, देशभरात लावण्यात आलेल्या लॉकडाउन मुळे राज्याचा कोट्यवधींचा महसूल थकीत असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना टप्प्यात वेतन देणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

Last Updated : Apr 7, 2020, 4:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details