महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक.. राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू - उद्योगमंत्री - industries in lockdown period

उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. रेड झोन वगळता सध्या राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना परवाने दिले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ९ हजार १४७ कारखान्यांना परवाने दिले आहेत. त्यापैकी ५७७४ कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे, असे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.

industry minister subhash desai  lockdown effect on industry  उद्योग जगतावर लाॉकडाऊनचा परिणाम  उद्योगमंत्री सुभाष देसाई  industries in lockdown period  industrial area starts maharashtra
उद्योगमंत्री सुभाष देसाई

By

Published : May 11, 2020, 2:41 PM IST

मुंबई -लॉकडाऊनच्या काळात ठप्प पडलेल्या उद्योग विश्वासाठी अतिशय महत्वाची बातमी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू असून सहा लाख कामगार रुजू झाले असल्याचे देसाई यांनी सांगितले. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, पुणेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आज उद्योगमंत्री बोलत होते.

कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसात घेतलेल्या काही निर्णयामुळे उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. रेड झोन वगळता सध्या राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना परवाने दिले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ९ हजार १४७ कारखान्यांना परवाने दिले आहेत. त्यापैकी ५७७४ कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.

देसाई म्हणाले की, मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी मे अखेर महाराष्ट्र ग्रीन झोन करायचा संकल्प केला आहे. त्यामुळे तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे. आपली पहिली लढाई कोरोनासोबत आहेत. त्यामुळे घाई करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी उद्योजकांना केले.

वीज बिलात सवलत -
स्थिर वीज बिलाबाबत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बील आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत, असे देसाई यांनी सांगितले.

लघू उद्योगांसाठी लवकरच आर्थिक पॅकेज -
राज्यातील लघू उद्योगांना सावरण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले. याशिवाय राज्य शासन लघू उद्योगांना इतर सुविधा पुरवण्याबाबत धोरण ठरवत आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

विदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी वाटाघाटी सुरू -
राज्यात विदेशी गुंतवणूकदार यावे, यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. अनेक देश महाराष्ट्राकडे चौकशी करत आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, तायवान, दक्षिण कोरिया येथील प्रतिनिधी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. पुढील काळात राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू होणार असल्याने लघू उद्योगांनी सेवा पुरवण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही उद्योगमंत्र्यांनी केले. तसेच या संवादात उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे सीईओ पी. अन्बलगन यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details