मुंबई- राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला असून २४ तासात २४ हजार ६१९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात १९ हजार ५२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३९८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३१ हजार ३५१ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईमध्ये संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचा उद्रेक; २४ हजार ६१९ नव्या रुग्णांची नोंद, ३९८ मृत्यू - rajesh tope latest news
महाराष्ट्रात आज २४ हजार ६१९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १९ हजार ५२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २४ तासात ३९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
![राज्यात कोरोनाचा उद्रेक; २४ हजार ६१९ नव्या रुग्णांची नोंद, ३९८ मृत्यू maharashtra corona update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8840783-thumbnail-3x2-maha-corona-update.jpg)
महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ११ लाख ४५ हजार ८४० झाली आहे. राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात ३९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३१ हजार ३५१ वर पोहोचली आहे. राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज १९ हजार ५२२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ८ लाख १२ हजार ३५४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९० टक्के आहे.