मुंबई :डोंबिवली शिळफाटा रस्त्यावरील लोढा हेवन गृहप्रकल्पातील शांती उपवन मधील एफ इमारतीला शनिवारी रात्री अकरा वाजता तडे जाण्यास सुरुवात झाली. त्यानंतर छत सुद्धा कोसळू लागल्याने रहिवाशी प्रचंड घाबरले. रहिवाशांना सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडा अन्यथा मोठा अनर्थ घडेल अशी समजूत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकढून देण्यात आली. नागरीक आवश्यक ते सामान घेऊन घरावर पडले. शांती उपवन इमारती १९९८ मध्ये एका विकासकाच्या मार्गदर्शनाखाली या भागातील एका लोकप्रतिनिधीच्या बांधकाम कंपनीने ही इमारती बांधल्या होत्या.
अनेक वर्ष देखभाल, दुरुस्ती नाही:याबद्दल बोलताना कल्याण डोंबिवली पालिकेचे ई विभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सांगितले की, पालिकेच्या संरचनात्मक अभियंत्याचा सल्ला घेऊन या इमारतींबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु इमारतींचे अनेक वर्ष देखभाल, दुरुस्ती केली नसल्याने असा प्रकार घडल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. शनिवारी रात्री अकरा वाजता तडे जाण्यास सुरुवात झाली व छत कोसळू लागले, असे प्रत्यक्ष दर्शनी रहिवाशांनी सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बारावी, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्याने येथे राहणारे विद्यार्थी व त्यांचे पालक फार मेटाकुटीला आले आहे. पुढचे दिवस कसे काढायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.