मुंबई : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी 2023 या वर्षातील (Maharashtra Public Holiday 2023) सार्वजनिक सुट्ट्या शुक्रवारी जाहीर केल्या. त्यानुसार आगामी वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना (state government employees) एकूण 24 सुट्ट्या मिळाल्या आहेत. मात्र, त्यातील चार सुट्ट्या शनिवार आणि रविवार आल्यामुळे (Maharashtra Government Calendar) बुडाल्या आहेत. तसेच येत्या नववर्षात म्हणजेच 2023 मध्ये नेमक्या कोणत्या दिवशी बँक बंद असणार आहे, याविषयी माहिती देणारे परिपत्रक महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आले आहे.(Happy New Year 2023)
यंदा 24 सार्वजनिक सुट्ट्या :
जानेवारी 2023
26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन - गुरुवार
फेब्रुवारी 2023
18 फेब्रुवारी - महाशिवरात्री - शनिवार
19 फेब्रुवारी - रविवार - छत्रपती शिवाजी महाराज जयंती
मार्च 2023
7 मार्च - होळी - मंगळवार
8 मार्च - रंगपंचमी - बुधवार
22 मार्च - गुढीपाडवा - बुधवार
30 मार्च - रामनवमी - गुरुवार
एप्रिल 2023
4 एप्रिल - महावीर जयंती - मंगळवार
7 एप्रिल - गुड फ्रायडे - शुक्रवार
14 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - शुक्रवार
मे 2023
1 मे - महाराष्ट्र दिन - सोमवार