मुंबई - राज्यात मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांमुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज (गुरूवारी) मुंबईत कोरोनाच्या 2 हजार 389 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 43 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 78 हजारावर गेला आहे.
मुंबईत कोरोनाच्या नव्या 2389 रुग्णांची नोंद; 43 रुग्णांचा मृत्यू - mumbai new corona patients
मुंबईत आज (गुरुवारी) 2 हजार 389 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 43 बाधितांची नोंद करण्यात आली.
मृतांपैकी 31 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 32 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. मृतांचा एकूण आकडा 8 हजार 320 वर पोहचला आहे. तर मुंबईमधून आज (गुरुवारी) 1 हजार 173 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. याबरोबरच मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 36 हजार 739 वर गेला आहे. सध्या, मुंबईत 32 हजार 849 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 55 दिवस तर सरासरी दर 1.26 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 590 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 365 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 9 लाख 64 हजार 609 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
असे वाढले रुग्ण -
दिनांक | रुग्णंसख्या |
2 | 1622 |
3 | 1526 |
4 | 1929 |
5 | 1735 |
6 | 1910 |
7 | 1788 |
8 | 1346 |
9 | 2227 |
10 | 2371 |
11 | 2172 |
12 | 2321 |
13 | 2085 |
14 | 2256 |
15 | 1585 |
16 | 2352 |
17 | 2389 |