महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई कोरोना अपडेट : मंगळवारी 2319 जणांची कोरोनावर मात; तर 1 हजार 713 रुग्णांची नोंद

मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. गेले सहा महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

mumbai corona update
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Sep 29, 2020, 10:39 PM IST

मुंबई - राज्यासह मुंबईत कोरोनाचा कहर सुरू आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारी मुंबईत 2 हजार 319 जणांनी कोरोनावर मात केली. तर 1 हजार 713 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 49 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. गेले सहा महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज (मंगळवारी) मुंबईत कोरोनाच्या 1 हजार 713 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मृतांमध्ये 40 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष तर 12 महिला रुग्ण आहेत. याबरोबरच मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 2 हजार 488 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 880 वर पोहोचला आहे. मुंबईमधून मंगळवारी 2 हजार 319 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 67 हजार 202 वर गेला आहे. सध्या मुंबईत 26 हजार 1 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 66 दिवस तर सरासरी दर 1.05 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 666 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 10 हजार 232 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 11 लाख 1 हजार 734 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details