मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा भारतासह राज्यातही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. 3 हजारांच्या वर लोकांना महाराष्ट्रात आत्तापर्यंत लागण झाली आहे. यामध्ये राज्यात 23 पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यातील पोलीसही कोरोनाच्या विळख्यात, 23 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह - 23 police corona in maharashtra
गभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा भारतासह राज्यातही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. 3 हजारांच्या वर लोकांना महाराष्ट्रात आत्तापर्यंत लागण झाली आहे. यामध्ये राज्यात 23 पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
![राज्यातील पोलीसही कोरोनाच्या विळख्यात, 23 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह 23 police personnel in Maharashtra have tested positive](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6822363-79-6822363-1587061754391.jpg)
राज्यातील पोलीसह कोरोनाच्या विळख्यात
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्यासह प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्ता राज्यात 23 पोलीसही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.