महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्याच्या सेवेत २३ सनदी अधिकारी नव्याने रूजू; निवड यादी जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी पदासाठी परिक्षा घेण्यात आल्या होत्या. या परिक्षेअंतर्गत राज्यातील २३ जणांची भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारीपदी निवड झाली आहे.

23 officers selected as  chartered officers
केंद्रीय लोकसेवा आयोग; २३ सनदी अधिकाऱ्यांची निवड

By

Published : Sep 4, 2020, 7:17 AM IST

मुंबई- मंत्रालय आणि महसूल केडरमधून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विभागाअंतर्गत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेअंतर्गत राज्यातील २३ जणांची भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

सनदी अधिकारी चंद्रकांत डांगे यांचे बंधु प्रदिपकुमार डांगे यांचीही सनदी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. यामुळे आता दोन्ही भाऊ सनदी अधिकारी म्हणून शासनाच्या सेवेत कार्यरत राहणार आहेत. तर, सिध्दराम सालीमठ यांचीही सनदी अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे 58 व्या वर्षी निवृत्त झालेले प्रमोद यादव आणि शामसुंदर पाटील यांचीही आयएसपदी वर्णी लागली आहे. यांच्या निवडीमुळे राज्याला आणखी २३ आयएएस अधिकारी मिळाले आहे.

निवड झालेली सनदी अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे -

यु.ए.जाधव
विजयकुमार फड
कान्हू बगाते
भाऊसाहेब डांगे
किसन जावळे
श्यामसुंदर पाटील
दिलीप स्वामी
संजय चव्हाण
सिध्दाराम सालीमठ
रघुनाथ गावडे
किशोर तावडे
कविता द्विवेदी
सुधाकर तेलंग
मंगेश मोहिते
शिवानंद टाकसाळे
राजेंद्र क्षीरसागर
प्रवीण पुरी
विजय मून
प्रदीप कुमार डांगी
वर्षा ठाकूर
डॉ.अनिल रामोद
सी.डी.जोशी

ABOUT THE AUTHOR

...view details