महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ST Workers Strike Update : 250 पैकी 215 डेपो सुरू; एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची माहिती

92 हजारांतील 3123 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहे. सध्या 88 हजार कर्मचारी पटावर आहेत. यातील 26500 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. 250 डेपोतील 215 डेपो सुरू झाले आहेत. ( 215 st depot starts out 250 ) 26 हजार 500 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने ( MSRTC MD Shekhar Channe ) यांनी दिली

MSRTC MD Shekhar Channe Mumbai
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने

By

Published : Jan 14, 2022, 5:50 PM IST

Updated : Jan 14, 2022, 7:04 PM IST

मुंबई - गेल्या ८० दिवसापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेले आहे. त्यामूळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत होती. मात्र, एसटी कामगारांचा कृती समिती आणि परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतर कर्मचारी कामावर येण्याची सुरूवात केली आहे. २६ हजार ५०० कर्मचारी कामावर हजर झाले असून 250 डेपोतील 215 डेपो सुरू झाले आहेत, ( 215 st depot starts out 250 ) अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने ( MSRTC MD Shekhar Channe ) यांनी दिली आहे.

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने पत्रकार परिषदेत बोलताना

एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली -

एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या संपावर तोडगा निघावा, यासाठी शरद पवार यांनी देखील प्रयत्न केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांसोबत (दहा जानेवारीला) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केली. या बैठकीनंतर एसटी कृती समितीच्या सदस्यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असं आवाहन केले. या आवाहनानंतर कामागर पुन्हा कामावर येत असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

दोन महिन्यांपासून संप सुरू -

92 हजारांतील 3,123 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. सध्या 88 हजार कर्मचारी पटावर आहेत. यातील 26500 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. राज्यात दिवसभरात लालपरीच्या 7 हजार फेऱ्या होत आहेत. तर 3 लाख 88 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. 2 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता दररोज रुजू होणाऱ्या कर्मचारी संख्येत वाढ होत आहे. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संपुर्ण संरक्षण दिले जात आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची कोणतीही प्रक्रिया नाही, असेही शेखर चन्ने यांनी सांगितले. ( Shekhar Channe on ST Workers Strike Update )

निलंबित कर्मचाऱ्यांना 3 वेळा आवाहन केले आहे. जे कामावर आले त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. लोकांना सेवा देणे आवश्यक असल्याने 700 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आहे. ही नियुक्ती 1 महिन्यासाठी आहे. चंद्रपूर, वर्धा, अकोला, बीड, अमरावती, नाशिक, पुणे, बीड येथे खासगी कर्मचारी कामावर आहेत. सेवानिवृत्त 400 कर्मचारी सेवेत येण्यास इच्छुक आहेत. यातील वय 62 पर्यंतचे 100 सेवानिवृत्त कर्मचारी रुजू झाले आहेत. त्यांना मेडिकल, फिटनेस चेक करून कामावर घेतले जात आहे.

हेही वाचा -ST workers strike : कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता घरूनच

12 कोटींचा तोटा -

आतापर्यंत 1200 कोटींचा तोटा झाला आहे. अतिरिक्त दंड आकारणी यावर मार्ग काढण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. जुन्या चेसिसवर नव्या MS बॉडीवर आक्षेप नसावा. कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा सुरू आहे. राज्यात, दररोज 300 ते 350 कर्मचारी होत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर कर्मचारी आत्महत्या या अत्यंत दुर्दैवी घटना आहेत. त्याला अनेक इतर कारणंही असू शकतात, असे त्यांनी सांगितले.

Last Updated : Jan 14, 2022, 7:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details