मुंबई : भारतीय पशुपालन निगम लिमिटेड ( Bhartiya Pashupalan Nigam Limited ) ने भरतीसाठी जाहीरता आणली आहे. बीपीएनएल भर्ती अधिसूचना 2022 नुसार, विकास अधिकारी, पशु सेवक, सहाय्यक विकास अधिकारी यांच्यासह 2106 पदांसाठी भरती केली जात आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांनी बीपीएनएल च्या अधिकृत वेबसाइट Bhartiyapashupalan.com वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर आहे.
पदांची संख्या आणि पगार :विकास अधिकारी पदाच्या एकूण 108 पदांची भरती करण्यात येत ( Number of posts and salary In BPNL ) आहे. यासाठी उमेदवारांना 25,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. सहाय्यक विकास अधिकारी पदाच्या एकूण 324 पदांची भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांना 22,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. पशु सेवकाच्या एकूण 1,620 पदांची भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांना 20,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. पशुपालक उन्नती केंद्र संचालकाच्या एकूण 33 पदांची भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांना 15,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या २१ जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांना 15,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.