महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई कोरोना अपडेट : दिलासादायक! 2092 रुग्णांची कोरोनावर मात; 1233 नवे रुग्ण

सोमवारी झालेल्या 45 मृत्यूंपैकी 35 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 34 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. याबरोबरच मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 43 हजार 172 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 776 वर पोहचला आहे.

mumbai corona update
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Oct 20, 2020, 1:25 AM IST

मुंबई -मार्चपासून मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली होती. मात्र, गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. सोमवारी मुंबईत कोरोनाच्या नव्या 1 हजार 233 रुग्णांची नोंद झाली. तर 45 रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी 2 हजार 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

गेल्या आठ दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 95 दिवस इतका वाढला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

सोमवारी झालेल्या 45 मृत्यूंपैकी 35 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 34 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. याबरोबरच मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 43 हजार 172 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 776 वर पोहचला आहे. मुंबईमधून सोमवारी 2 हजार 92 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 12 हजार 905 वर गेला आहे. सध्या मुंबईत 18 हजार 624 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 95 दिवस तर सरासरी दर 0.73 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 632 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 473 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 13 लाख 63 हजार 205 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला -

मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 93 दिवसांपर्यंत पोहचला होता. हा कालावधी धार्मिक सणांनंतर 45 दिवस इतका खाली आला होता. आता पुन्हा हा कालावधी दिवसागणिक वाढतच आहे. 10 ऑक्टोबरला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 दिवस इतका होता. 18 ऑक्टोबरला हा कालावधी 95 दिवस इतका झाला आहे. तर 10 ऑक्टोबरला रुग्ण वाढीचा दर 1.01 टक्के होता 18 ऑक्टोबरला हा दर 0.73 टक्के इतका झाला आहे.

ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी

तारीख दुप्पटीचा कालावधी
10 69 दिवस
11 69 दिवस
12 71 दिवस
13 73 दिवस
14 77 दिवस
15 82 दिवस
16 86 दिवस
17 90 दिवस
18 95 दिवस

ABOUT THE AUTHOR

...view details