महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात काँग्रेसच्या 208 सभा, राहुल गांधीच्या 5 तर थोरातांच्या 58

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एकही सभा घेतली नाही. तर काँग्रेसच्या ज्या स्टार प्रचारकांमध्ये सर्वात जास्त नाव आघाडीवर होते. त्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी याही राज्यात फिरकल्या नाहीत.

राहुल गांधी

By

Published : Oct 20, 2019, 10:55 AM IST

मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मागील 15 दिवसात राजकीय मतदारसंघात सहभाग घेण्याबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या खूप मागे राहिले. काँग्रेसने राज्यात केवळ 208 सभा घेतल्या आहेत. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या केवळ 5 सभा झाल्या असून त्यानंतर राज्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वाधिक अशा 58 सभा राज्यात विविध मतदारसंघात घेतल्या.

हेही वाचा -मुंबईत भरपावसात उमेदवारांचा प्रचार

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एकही सभा घेतली नाही. तर काँग्रेसच्या ज्या स्टार प्रचारकांमध्ये सर्वात जास्त नाव आघाडीवर होते. त्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी याही राज्यात फिरकल्या नाहीत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी खासदार व चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रत्येकी 5 अशा सभा झाल्या आहेत.

काँग्रेसचे राज्याचे प्रभारी व माजी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी 13, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी 12, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी 4, मुकुल वासनिक यांनी 28 आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी 15 सभा घेतल्या. यात मुंबईत एकही सभा नसून सर्वाधिक सभा या नांदेड जिल्ह्यात झाल्या आहेत. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये ज्याची प्रामुख्याने नावे होती, त्यात राजीव सातव यांच्या 12, हुसेन दलवाई यांच्या 16 आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या 15 सभा राज्यात झाल्या आहेत.

मुंबई काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीत गटबाजी कायम राहिल्याने राहुल गांधी यांच्या दोन सभांचा अपवाद सोडल्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा आदींच्या सभा झाल्या. तर विलेपार्ले, कलिना आदी अनेक मतदारसंघात काँग्रेसचे कोणतेही आजी माजी नेते प्रचारासाठी साधे फिरकलेही नाहीत.

हेही वाचा -वरळी मतदारसंघात चार कोटींची संशयास्पद रक्कम जप्त

लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंबई प्रदेश अध्यक्ष पदावरून दूर सारलेल्या माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या जवळच्या एकाही व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली नसल्याने त्यांनी या निवडणुकीत मुंबईत प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तर, कोणताही वाद नसताना माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात भाग घेतला नाही. राहुल गांधी यांच्या मुंबईत 2 सभा झाल्या, त्यावेळीही देवरा गायब राहिले. त्यामुळे मुंबईत काँग्रेसचा चांदीवली आणि शिव-कोळीवाडा या काही मतदारसंघाचा अपवाद वगळता प्रचाराचा कोणताही जोर दिसला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details