- शिवाजी कर्डीलेंची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर
अहमदनगर - राहुरी तालुक्याचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांनी आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. लोकसभेची निवडणूक झाल्या नंतर विधानसभेचा निवडणुकीच्या वेळी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील जर भाजपात आले तर मी त्यांना मंत्री करण्याची मागणी करणार आहे. अशी खुली ऑफर भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना दिली आहे. वाचा सविस्तर
- जनतेला संबोधित करत गडकरींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा आरोप
नागपूर- नितीन गडकरींनी २५ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी जनतेला संबोधित केले हा आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. त्याचबरोबर या संदर्भात उद्या निवडणूक अधिकाऱयांकडे गडकरींविरोधात तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर
- काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नवनीत राणांकडून घेतले एकनिष्ठेचे आश्वासन
अमरावती- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या विजयी झाल्यावर भाजपत तर जाणार नाहीत, तसेच जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसमध्ये ढवळा-ढवळ करून विधनसभा निवडणुकीत दर्यापूर आणि मेळघाट मतदारसंघात काँग्रेसला अडथळा तर आणणार नाहीत, अशा विविध शंकांचे निरसन करून काँग्रेसने आमदार रवी राणा आणि लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून एकनिष्ठेचे आश्वासन घेतले. वाचा सविस्तर
- समृद्धी महामार्गाविरोधातील आंदोलन; तब्बल २ वर्षांनंतर राजू शेट्टींसह पाच जणांवर गुन्हा दाखल
नाशिक -दोन वर्षांपूर्वी राजू शेट्टी यांनी समृद्धी महामार्गाविरोधात आंदोलन केले होते. याप्रकरणी आज त्यांच्यावर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी खासदार राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्ह्यातील शिवडे या गावात जाऊन समृद्धी महामार्गाविरोधात जाहीर सभा घेतली होती.
- वैज्ञानिकांचं कर्तृत्व आहे त्यांना सांगू द्या, तुम्ही कशाला सांगता; राज ठाकरेंच पंतप्रधानांवर ट्विटास्त्र
मुंबई - एका अंतर्गत चाचणीचा भाग म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. या कामगिरीसाठी वैज्ञानिक अभिनंदनास पात्र आहेत. अभिमान बाळगावा अशी ही कामगिरी आहे. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करुन ही बातमी सांगायची काय गरज? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी याविषयी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. वाचा सविस्तर
- प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
बीड -भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जासोबत दिलेली माहिती खोटी आहे. याशिवाय बहुतांश माहिती दडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आक्षेप घेतल्यावरूनच माझ्यावर जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिसांसमोर पंकजा मुंडे व भाजपच्या गुंडांनी हल्ला केला, असा आरोप दादासाहेब मुंडे या काँग्रेस कार्यकर्त्याने केला आहे. वाचा सविस्तर
- तिकीट कापण्याची धमकी देत माझ्याकडून कोट्यवधी रुपये उकळले; ए.टी. पाटलांचा गौप्यस्फोट
जळगाव - लोकसभा निवडणुकीचे तिकीट कापल्यामुळे भाजप खासदार ए.टी. पाटील हे बंडाच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. तिकीट कापण्याची धमकी देऊन माझ्याकडून कोट्यवधी रुपये उकळले असल्याचा गौप्यस्फोट पाटील यांनी केला. वाचा सविस्तर