महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; आणखी एक साक्षीदार फितूर, एकूण 30 साक्षीदार झाले फितूर

२००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गुरुवारी रिअल इस्टेट एजंट असलेला आणखी एक साक्षीदर फितूर झाला आहे. हा ३० वा साक्षीदार फितूर ठरला आहे. या प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी गुप्त खबरी म्हणून या साक्षीदाराची निवड केली होती. मात्र, हाच साक्षीदार न्यायालयात फितूर झाला आहे.

FILE PHOTO
फाईल फोटो

By

Published : Mar 23, 2023, 9:39 PM IST

मुंबई - 2008 मधील मालेगाव स्फोटाप्रकरणी सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने याप्रकरणाबाबत सुरुवातील तपास केला होता. या साक्षीदाराने 2008 मध्ये एक जबाब दिला होता. परंतु, न्यायालयासमोर साक्षीदाराने सांगितले की, त्याने तपास संस्थेला कोणतेही वक्तव्य दिल्याचे आठवत नाही, त्यानंतर न्यायालयाने त्याला फितूर म्हणून घोषित केले होते.

साक्षीदार फितूर -तक्रारीनुसार, या खटल्यात विरोध करणारा हा 30 वा साक्षीदार आहे. तक्रारदाराने दावा केला होता की, साक्षीदाराने एटीएसला सांगितले होते की तो एका सामान्य ओळखीच्या व्यक्तीद्वारे पुरोहित यांना भेटला होता आणि ते संपर्कात होते. नंतर पुरोहित यांनी त्याला लष्करी गुप्तचरांसाठी माहिती गोळा करण्यासाठी भरती केले आणि त्याला ओळखपत्रही दिले, असे एटीएसने म्हटले आहे.

आरोपीला ओळखले नाही - पुरोहित यांनी हिंदुत्व विचारसरणीचा प्रसार करण्याविषयी सांगितले आणि त्या धर्तीवर संघटना उभारण्याचे काम करत असल्याचे सांगितले, एटीएसने साक्षीदाराच्या हवाल्याने सांगितले. साक्षीदाराने पुण्यातील अभिनव भारत या गुप्त संस्थेच्या बैठकीलाही हजेरी लावली होती, जिथे इतर आरोपीही उपस्थित होते, असा दावा एटीएसच्या निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, गुरुवारी न्यायालयात फक्त पुरोहित यांनाच साक्षीदाराने ओळखले आणि इतर आरोपींना त्याने ओळखले नाही.

न्यायालयात सुनावणी सुरू - मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील आणखी एक साक्षीदार 23 मार्चला फितूर झाला. त्यामुळे खटल्यातील फितूर साक्षीदारांची संख्या 30 झाली. याप्रकरणाची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुरु असून, यातून नवनवीन खुलासे आता समोर येताना पाहायला मिळत आहेत.

काय आहे प्रकरण - 29 सप्टेंबर 2008 या दिवशी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलमध्ये हा बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेमध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक नागरिक या घटनेत जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण NIA ला वर्ग केले होते. भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या प्रकरणात आरोपी असून, या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details