महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक, दिवसभरात २० हजार ४८९ नव्या रुग्णांची वाढ - maharashtra corona total patients

आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 लाख 83 हजार 862 वर पोहोचली आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे आज (रविवारी) दिवसभरात 10 हजार 801 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Sep 5, 2020, 10:38 PM IST

Updated : Sep 5, 2020, 10:55 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतच आहे. आज (शनिवारी) राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. रविवारी तब्बल 20 हजार 489 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 312 जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 लाख 83 हजार 862 वर पोहोचली आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे आज (रविवारी) दिवसभरात 10 हजार 801 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

राज्यातील एकूण 8 लाख 83 हजार 862 कोरोनाबाधितांपैकी 6 लाख 36 हजार 574 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 2 लाख 20 हजार 661 अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत राज्यात 26 हजार 276 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Last Updated : Sep 5, 2020, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details