मुंबई - राज्यात आज 2 हजार 768 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 41 हजार 398 वर पोहचला आहे. तर, आज 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 280 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.72 टक्के, तर मृत्यूदर 2.51 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा -मानखुर्द परिसरात भीषण आग, तब्बल 21 तासांनी मिळवले नियंत्रण
आज 1 हजार 739 रुग्ण बरे
राज्यात आज 1 हजार 739 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 53 हजार 926 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 49 लाख 28 हजार 130 नमुन्यांपैकी 20 लाख 41 हजार 398 नमुने म्हणजेच, 13.67 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 73 हजार 504 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 34 हजार 934 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद
राज्यात गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबर 2020 ला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924, तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा -मुंबईतील हॉटेल आणि बार रात्री १ वाजेपर्यंत सुरु राहणार; महापालिकेचे परिपत्रक